
भोपाळ: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते आज बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून अचूक वेळ समजू शकेल. कालगणनेची ही वैदिक पद्धत भारताचा समृद्ध प्राचीन, सांस्कृतिक वारसा असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. या घड्याळाच्या निर्मितीमध्ये राज्याच्या उच्चशिक्षण आणि सांस्कृतिक विभागाने मोलाची भूमिका पार पाडली.