कर्नाटकातील होस्कोटे तालुक्यातील तिरुमलशेट्टीहळ्ळी पोलिसांनी कट्टीगेनहळ्ळी गावातून बेकायदेशीरपणे साठवलेले रक्तचंदनाचे १८० ओंडके जप्त केले आहेत.
बंगळूर : कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) तिरुपती येथून तस्करी केलेले एक कोटीचे रक्तचंदन (Sandalwood Tree) जप्त केले. रक्तचंदनाच्या तस्करीवर मोठी कारवाई करताना कर्नाटक पोलिसांनी बंगळूर ग्रामीणमध्ये एक कोटी किमतीचे १८० ओंडके जप्त केले. हा अवैध माल जंगलात लपवण्यात आला होता. तो आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे लपवल्याचे सांगण्यात येत आहे.