पत्नीचं शीर हातात घेऊन तो चालत होता...

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

पत्नीचं शीर कापल्यानंतर हातामध्ये घेऊन तो रस्त्यावरून चालत होता, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हैद्राबादः दोघांचा पाच वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता. पण, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. पत्नीने पती विरोधात गुन्हा दाखल केला. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने पत्नीचा बदला घेतला. पत्नीचं शीर कापल्यानंतर हातामध्ये घेऊन तो रस्त्यावरून चालत होता, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ही घटना घडली आहे. हातामध्ये शीर पाहून नागरिक घाबरले होते. एक व्यक्ती शीर हातात घेऊन रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, काही वेळातच त्याने पोलिसांकडे आत्मसर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिस उपायुक्त विजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रदीप व मनीक्रांतीचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पुढे त्यांच्यामध्ये बांडणे होऊ लागली. यामुळे मनीक्रांतीने पोलिसांकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. पोलिसांनी प्रदीपला अटक केली. जामिनावर सुटका झाल्यानंतर प्रदीपने बदला घेण्यासाठी मनीक्रांतीचा गळा कापून हत्या केली. पत्नीचे शीर धडापासून वेगळे केले व शीर हातात घेऊन तो रस्त्यावर चालत होता. यावेळी त्याच्या दुसऱ्या हातात चाकू होता. काही वेळानंतर त्याने पोलिसांकडे आत्मसर्पन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.'

दरम्यान, प्रदीपच्या हातामध्ये शीर असल्याचे पाहून नागरिक पळत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andhra man beheads wife walks on road with severed head in vijayawada