Amit Shah : गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक; संशयित व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे.
Amit Shah Visit Mumbai
Amit Shah Visit Mumbaiesakal
Summary

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे.

Amit Shah Visit Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झालीय. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक केलीय. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान या व्यक्तीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी संशयितरित्या फेऱ्या मारल्या होत्या. याचदरम्यान त्यांनी अमित शहांच्या जवळ जाण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला होता.

गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत येऊन गेले होते. पण, त्यांच्या या दौऱ्यामध्ये सुरक्षेत मोठी चुकू झाल्याचं समोर आलंय. शहा यांच्याजवळ एक व्यक्ती संशयितरित्या फिरत होता. पोलिसांनी या व्यक्तीला अखेर ताब्यात घेतलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. एकदिवशी दौऱ्यामध्ये त्यांनी लालबागचा राजा आणि भाजप नेत्यांची बैठक घेतली होती. पण, या दौऱ्यादरम्यान एक व्यक्ती शहा यांच्या जवळपास पोहोचली होती. बऱ्याच वेळ ही व्यक्ती भटकत होती.

Amit Shah Visit Mumbai
Love Affair : दोघांचं एकाच लेडी कॉन्स्टेबलवर जडलं 'प्रेम'; गोळीबार करत ठाण्यातच हाणामारी

हेमंत पवार (Hemant Pawar) असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण धुळ्यात राहणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. हेमंत पवारनं आधी आपण आंधप्रदेश सरकारमधील खासदाराचा सचिव असल्याचं सांगून अमित शहा यांच्याजवळपास फिरत होता. त्याच्या वागणुकीवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीनं मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असता तो धुळ्याचा असल्याचं उघड झालंय. पण, ही व्यक्ती का संशयितरित्या फिरत होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.

Amit Shah Visit Mumbai
Delhi : शाळा-महाविद्यालयांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या 8 तरुणांना अटक

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com