Andhra Pradesh new 10-hour workday policy 2025 : आंध्र प्रदेश सरकारने नुकतेच कामगार कायद्यातील बदलांना मंजुरी दिली आहे. यानुसार, खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्यात आले आहेत. आता कर्मचाऱ्यांना ९ तासांऐवजी १० तास काम करावे लागणार आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) सरकारने हा निर्णय घेतला आहे.