esakal | बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 13 प्रवाशी ठार, 4 जण जखमी 
sakal

बोलून बातमी शोधा

accident

आंध्र प्रदेशच्या कुरनुल जिल्ह्यामधील मदारपूरन गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला

बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 13 प्रवाशी ठार, 4 जण जखमी 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद- आंध्र प्रदेशच्या कुरनुल जिल्ह्यामधील मदारपूरन गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या अपघातात 13 लोक ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जखमींना जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

पडेल ते काम करणार पण पोरीला शिकवणार; संकटांना पुरुन उरणारी आई

कुरनुलच्या पोलिस अधिक्षकांनी सांगितलं की, वाहनामधून 18 लोक प्रवास करत होते. हा अपघात कुरनुलपासून जवळपास 25 किलोमीटर दूर असणाऱ्या मदारहपुरमजवळ वेलदुर्ती मंडलजवळ रविवारी सकाळी 4 वाजता झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एनएनआयने यासंदर्भातीव वृत्त दिलं आहे.

रविवारी सकाळी ट्रक आणि बसची टक्कर झाली. टक्कर इतकी भीषण होती की 18 प्रवाशांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेची आठवण झाली. विशाखापट्टनम जिल्ह्यातील अराकुजवळ अनंतगिरीमध्ये एक बस खोल दरीत पडली होती. बसमध्ये 30 लोक होते, त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला होता.