‘आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच’

तेलुगू देसम सरकारने राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरण (सीआरडीए) कायद्यानुसार अमरावतीचा विकास करण्यास सुरुवात केली होती. त्याचे पालन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
Amaravati remains capital of Andhra Pradesh
Amaravati remains capital of Andhra Pradeshsakal

हैदराबाद : अमरावतीचा विकास राजधानीप्रमाणे करा, असा आदेश आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. मागील तेलुगू देसम सरकारने राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरण (सीआरडीए) कायद्यानुसार अमरावतीचा विकास करण्यास सुरुवात केली होती. त्याचे पालन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

राजधानी अमरावतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालय म्हणाले, की सरकारने या जमिनी विकसित करून तीन महिन्यांत त्या शेतकऱ्यांना द्याव्यात. वायएसआर काँग्रेस पक्षाने अमरावतीऐवजी तीन राजधान्या तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com