

Ayurvedic Doctor Surgery Permission
ESakal
आंध्र प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये प्रशिक्षित पदव्युत्तर आयुर्वेदिक डॉक्टरांना स्वतःहून काही विशेष शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचा उद्देश प्राचीन आयुर्वेदिक प्रणालीला आधुनिक औषधांशी जोडणे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने या आदेशाला तीव्र विरोध केला आहे. IMA म्हणते की, हे रुग्णांसाठी धोकादायक असू शकते आणि दोन्ही प्रणालींचे मिश्रण करणे चुकीचे आहे.