आंध्र प्रदेश सरकारची कर्मचाऱ्यांना दुहेरी भेट; पगारात वाढ व निवृत्तीचे वय केले ६२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paise

आंध्र प्रदेश सरकारची दुहेरी भेट; पगारात वाढ व निवृत्तीचे वय केले ६२

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दुहेरी भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात २३.२९ टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षांवरून ६२ वर्षे केले आहे. १ जानेवारी २०२२ पासून हा बदल लागू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Y S Jagan Mohan Reddy) यांनी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.

वाढीव वेतनाचा लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. रेड्डी (Y S Jagan Mohan Reddy) यांनी यावर्षी ३० जूनपर्यंत कर्मचाऱ्यांच्या इतर समस्यांवर तोडगा काढण्याबाबत बोलले आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. पगारातील हा बदल १ जुलै २०१८ पासून लागू होईल. त्याच्याशी संबंधित आर्थिक लाभ १ एप्रिल २०२० पासून दिला जाईल. वाढीव पगारासह नवीन वेतन १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे, असे जगन यांनी कर्मचारी संघटनेला सांगितले.

थकीत महागाई भत्ता (DA) जानेवारीच्या पगारासह दिला जाईल. यासोबतच भविष्य निर्वाह निधी, विमा, रजा रोख रक्कम आणि इतर प्रलंबित देयके एप्रिलपर्यंत पूर्ण होतील, असे मुख्यमंत्र्यांनी (Y S Jagan Mohan Reddy) कर्मचारी संघटनांना सांगितले. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, या निर्णयामुळे आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारी (Government) तिजोरीवर वार्षिक १०,२४७ कोटींचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.

Web Title: Andhra Pradesh Government Retirement Age Of Government Employees 62 Ordinance Issued Y S Jagan Mohan Reddy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top