esakal | विद्यार्थ्यांनो, आता शाळा होणार सुरु...
sakal

बोलून बातमी शोधा

School

देशभरातील बहुतांश शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता शाळा सुरु करण्याचा विचार सुरु असून, येत्या 5 सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. 

विद्यार्थ्यांनो, आता शाळा होणार सुरु...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातच देशभरातील बहुतांश शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता शाळा सुरु करण्याचा विचार सुरु असून, येत्या 5 सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणता यावा म्हणून देशात लॉकडाऊनही लागू करण्यात आला. त्यानुसार सर्वच व्यवहार बंद करण्यात आले होते. यामध्ये शाळा, महाविद्यालये तसेच नियोजित परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता आंध्र प्रदेश सरकारने शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबत जगन मोहन रेड्डी आणि शिक्षणमंत्री आदिमुलापु सुरेश यांनी सांगितले, की सरकारने शाळा सुरु करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यानुसार येत्या 5 सप्टेंबरपासून शाळा सुरु केल्या जातील. परंतु, यावर अंतिम निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात येईल, असेदेखील स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आदिमुलापु सुरेश यांनी सांगितले, की जोपर्यंत शाळा सुरु होत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनऐवजी रेशन दिले जाईल. तसेच पुढच्या टप्प्यात LKG आणि UKG ची सुरुवात शाळांमध्येच केली जाणार आहे. याशिवाय आंध्र प्रदेश EAMCET, JEE, IIIT साठीही तयारी सुरु केली जाणार आहे. 

आंध्र प्रदेशात 55 हजारांहून अधिक रुग्ण

आंध्र प्रदेशात मंगळवारी जवळपास 5 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 55,773 वर पोहोचला आहे. तर 1232 कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा