तब्बल 8 IAS अधिकाऱ्यांना हायकोर्टाकडून शिक्षा; हॉस्पिटल्समध्ये करावी लागेल समाजसेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल 8 IAS अधिकाऱ्यांना हायकोर्टाकडून शिक्षा

तब्बल 8 IAS अधिकाऱ्यांना हायकोर्टाकडून शिक्षा

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश हाय कोर्टाने आज गुरुवारी आठ IAS अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली आहे. या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोर्टाची अवमानना करण्याचा आरोप होता. त्याबद्दल या अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधातील या प्रकरणामध्ये सुनावणी करताना आंध्र प्रदेश हायकोर्टाने या IAS अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना दोन आठवड्यांसाठी तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला आहे. (Andhra Pradesh High Court)

हेही वाचा: भारतात होणारे 67 टक्के गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू

कोर्टाच्या या निर्णयानंतर या IAS अधिकाऱ्यांनी हायकोर्टाची माफी मागितली आहे. या माफीनंतर हायकोर्टाने जरा नरम पवित्र घेत आपला निर्णय थोडा सौम्य केला. कोर्टाने 8 IAS अधिकाऱ्यांना एका वर्षासाठी एखाद्या कल्याणकारी हॉस्पिटलमध्ये समाजसेवा करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या या निर्णयानुसार, शिक्षा म्हणून या IAS अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये समाजसेवा करावी लागणार आहे. (Andhra Pradesh High Court)

हेही वाचा: रतन टाटा यांना भारतरत्न द्या; हायकोर्टाने दिला याचिका दाखल करण्यास नकार

नेमकं काय हे प्रकरण?

शाळांमध्ये ग्रामसचिवालय सुरू न करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने कोर्टाने संताप व्यक्त केला. कोर्टाने अवमान प्रकरणी 8 आयएएस अधिकाऱ्यांना दोषी ठरवून दोन आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, आयएएस अधिकाऱ्यांनी माफी मागितल्याने उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करत सर्व आयएएस अधिकाऱ्यांना सेवा कार्यक्रम करण्याचे आदेश दिले.

विजया कुमार, श्यामला राव, गोपाला कृष्ण द्विवेदी, श्रीलक्ष्मी, बुदिती राजशेखर, गिरिजा शंकर, चिन्ना वीरभद्र आणि एमएम नायक अशी या दोषी अधिकाऱ्यांची नावे आहेत. कल्याणकारी वसतिगृहांमध्ये सेवा कार्यक्रम करावेत आणि समाजकल्याण वसतिगृहांमध्ये वर्षातून एक दिवसाच्या जेवणाचा खर्च उचलावा, अशी सूचना कोर्टाने त्यांना दिली आहे. तसेच एका दिवसासाठी न्यायालयीन खर्च उचलण्याचे निर्देश दिले आहेत. (Andhra Pradesh High Court)

Web Title: Andhra Pradesh High Court 8 Ias Officers Social Service At Welfare Hospitals Regarding Contempt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top