
रतन टाटा यांना भारतरत्न द्या; हायकोर्टाने दिला याचिका दाखल करण्यास नकार
नवी दिल्ली : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) नकार दिला आहे. भारतरत्न (Bharat Ratna) कोणाला द्यायचा हे आता न्यायालय ठरवणार का, असा सवाल प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. (Delhi HC refuses to entertain PIL seeking 'Bharat Ratna' award to Ratan Tata)
ही कोणत्या प्रकारची याचिका आहे? खंडपीठाने याचिकाकर्ते राकेश कुमार यांचे वकील अरविंद कुमार दुबे यांना एकतर याचिका मागे घेण्यास सांगितले, अन्यथा न्यायालय दंड ठोठावून ती फेटाळून लावेल. कोर्टाची बाजू मांडत वकिलांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. त्यावर खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.
हेही वाचा: सकाळी आजोबाचा मृत्यू अन् रात्री नातवाला बिबट्याने नेले उचलून
रतन टाटा (Ratan Tata) यांनी आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी वाहून घेतले आहे. त्यांनी तरुण उद्योजकांना पुढे नेण्याचे काम केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळात लोकांना मदत केली, असे राकेश कुमार यांनी अधिवक्ता अरविंद कुमार दुबे यांच्या मार्फत याचिका दाखल करताना म्हटले होते. देशसेवेसाठी आतापर्यंत विविध श्रेणीतील ४८ जणांना भारतरत्न देण्यात आले आहेत. रतन टाटा यांना भारतरत्न (Bharatratna) देण्याची मागणी जनतेतून होत आहे. रतन टाटा यांना २००० मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आतापर्यंत फक्त एका उद्योगपतीला भारतरत्न
आतापर्यंत फक्त एका उद्योगपतीला भारतरत्न (Bharatratna) देण्यात आला आहे. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच जेआरडी टाटा यांना १९९२ मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. जेआरडी टाटा ५३ वर्षे टाटा सन्सचे अध्यक्ष होते. जेआरडी टाटा हे या समूहाचे सर्वांत यशस्वी अध्यक्ष मानले जातात यात शंका नाही. जेआरडी यांनी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले आणि ते १९९१ पर्यंत पदावर राहिले.
Web Title: Bharatratna To Ratan Tata Refusal To File Petition High Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..