

India Weather News Andhra Pradesh Odisha Prepare for Cyclone Six Lakh Evacuated Ten States Face Possible Rainfall
sakal
भुवनेश्वर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णव’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकत असून उद्या (ता. २७) त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, बुधवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १४० कि.मी.पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशासह सुमारे दहा राज्यांत पावसाची शक्यता आहे.