Andhra Pradesh Politics: बिहार झालं आता BJP चं लक्ष आंध्र प्रदेश...! भाजपचा फॉर्म्युला B-J-P काय आहे?

Andhra Pradesh Politics: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विविध राज्यांमध्ये आपली स्थिती मजबूत करत आहेत. नुकतेच भाजपने बिहार आपल्या ताब्यात घेतले आहेत. भाजपचे लक्ष आता आंध्र प्रदेशवर आहे.
Andhra Pradesh Politics
Andhra Pradesh Politics

Andhra Pradesh Politics: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विविध राज्यांमध्ये आपली स्थिती मजबूत करत आहेत. नुकतेच भाजपने बिहार आपल्या ताब्यात घेतले आहेत. भाजपचे लक्ष आता आंध्र प्रदेशवर आहे. आंध्र प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व नाही. चंद्राबाबू नायडू, जगनमोहन रेड्डी आणि पवन कल्याण या प्रादेशिक दिग्गजांच्या बळावर भाजपला राजकीय फायदा मिळवायचा आहे.

दरम्यान भाजप आंध्र प्रदेशवर ताबा मिळवण्यासाठी फॉर्म्युला B-J-P वर काम करत आहे. बी (चंद्रबाबू नायडू), जे (जगनमोहन रेड्डी) आणि पी (पवन कल्याण) असा बी-जे-पी फॉर्म्युला भाजप आजमावत असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे.

आंध्र प्रदेशातील नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत जो विजयी होईल, भाजप त्याच्यासोबत जाणार हेही निश्चित आहे.सध्या नायडू आणि रेड्डी या दोघांनी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली.पण हे प्रकरण वाटते तितक्या सहजतेने सुटताना दिसत नाही.

प्रथम तेलुगुदेसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली.अवघ्या २४ तासांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही दिल्ली गाठून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.जगन रेड्डी यांनी आपल्या राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी घेऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे देखील सांगितले जात आहे.

Andhra Pradesh Politics
Bharat Ratna : ''बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या'' राज ठाकरेंसह राऊतांची मागणी; म्हणाले, हेच औदार्य...

भाजपची अडचण काय?

आंध्र प्रदेशात भाजपची ताकद नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व 173 जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. एनडीटीव्हीनुसार, रेड्डी आणि नायडू यांचे पक्षही युतीसाठी फारसे इच्छुक नाहीत.भाजपसोबत जागा वाटपामुळे त्यांच्या ताकदीला हानी पोहोचेल हे दोन्ही पक्षांना माहीत आहे.त्याच वेळी, टीडीपी प्रमुखांना अल्पसंख्याकांची मते गमावण्याची भीती देखील असू शकते. (Latest Marathi News)

जगनमोहन रेड्डी यांच्या तुलनेत चंद्राबाबू नायडू यांची राज्यात विजयाची शक्यता फारशी नाही.भाजपही नायडूंना फारसे महत्त्व देणार नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांनी यापूर्वी दोनदा एनडीए सोडली आहे. 2018 मध्ये भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे कायमचे बंद झाल्याचे सांगितले होते. चंद्राबाबू नायडू यांची मजबुरी अशी आहे की त्यांच्याविरुद्ध अनेक न्यायालयीन खटले आहेत.अशा स्थितीत केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाने आपल्यासोबत असावे असे त्यांना वाटते. त्यामुळे ते भाजपकडे वळले आहेत.

या परिस्थितीत जगनमोहन रेड्डी भाजपमध्ये जाण्याची शक्यता बळावली आहे. पण केंद्रात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू नये, अशी जगन मोहन यांची इच्छा आहे.जेणेकरून आंध्र प्रदेश स्वतःच्या अटींवर केंद्रात स्थापन झालेल्या सरकारशी करार करू शकेल.दुसरीकडे, आंध्र प्रदेशात युतीबाबत भाजपच्या गोटातही एकमत नाही.

Andhra Pradesh Politics
Nirbhay Bano: पुण्यात 'निर्भय बनो' सभेदरम्यान काँग्रेस अन् भाजप कार्यकर्ते आमनेसामने; पोलिसांनी निखिल वागळेंना सरोदेंच्या घरीच थांबवलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com