Nirbhay Bano: पुण्यात 'निर्भय बनो' सभेदरम्यान काँग्रेस अन् भाजप कार्यकर्ते आमनेसामने; पोलिसांनी निखिल वागळेंना सरोदेंच्या घरीच थांबवलं

केंद्रातील मोदी सरकारविरोधात पुरोगामी कार्यकर्त्यांनी एकत्र येत राज्यभर या सभा सुरु केल्या आहेत.
Nirbhay Bano_Nikhil Wagle
Nirbhay Bano_Nikhil Wagle

पुण्यात दांडेकर पूल भागातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात आज 'निर्भय बनो' सभा होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी एकत्र येत राज्यभर या सभा सुरु केल्या आहेत. यातील एक सभा आज पुण्यात संध्याकाळी ६.३० वाजता पार पडणार आहे. पण या सभेला भाजपच्यावतीनं जोरदार विरोध करण्यात आला आहे.

तर त्यांच्याविरोधात आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील समोरासमोर आले आहेत. तसेच दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. गेल्या तासभरापासून राष्ट्र सेवा दलाबाहेर हा गोंधळ सुरु आहे. (nirbhay bano pune rally emerged rusk between mva and bjp supporters outside of rashtra seva dal)

Nirbhay Bano_Nikhil Wagle
Bharat Ratna Award: "दलित व्यक्तीमत्वांकडं दुर्लक्ष नको, कांशीराम यांनाही भारतरत्न द्या"; मायावतींची सरकारकडं मागणी

पुरोगामी संघटना एकत्र

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या समर्थनासाठी आप, काँगेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (पवार गट), पुरोगामी पक्ष, संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या सभेला वागळे यांच्यासह, मानवाधिकार कार्यकर्ते आणि अॅड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती आहे. (Marathi Tajya Batmya)

Nirbhay Bano_Nikhil Wagle
Register Voters: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठा बदल दिसणार? 2 कोटी नवे मतदार ठरवणार भवितव्य

सरोदेंच्या घरी फौजफाटा

दरम्यान, असीम सरोदे यांची घरी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निखिल वागळे आणि असीम सरोदे यांनी सभेठिकाणी जाऊ नये, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं आहे. पण तरीही वागळे आणि सरोदे सभेच्या ठिकाणी जाण्यावर ठाम आहेत. काल निखिल वागळेंविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भातही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. (Latest Marathi News)

Nirbhay Bano_Nikhil Wagle
Valentine Day 2024 : राणी पद्मावती अन् राजा रतनसिंहाच्या प्रेमाचे प्रतिक आहे चित्तोडगड, जोडीदारासोबत भेट देतात पर्यटक

भाजपनं पुण्यातील सभेला थेटपणे विरोध केला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "भाजपच्या कार्यकर्त्यानी लोकशाहीविरोधात आंदोलन करणं अपेक्षित होतं. त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही आवडत नाही. निखिल वागळेंनी आमचाही विरोध केला आहे, पण आमचा त्यांना पाठिंबा आहे. पोलिसांना विनंती करु गृहमंत्र्यांचं एवढं ऐकू नका"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com