Andhra Pradesh : टँकर स्वच्छ करताना मोठा अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanker Accident

Andhra Pradesh : टँकर स्वच्छ करताना मोठा अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Andhra Pradesh : आंध्रप्रदेशमध्ये मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

खाद्यतेल उत्पादक कंपनीत टँकर साफ करताना कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास आंध्रप्रदेशातील रागमपेटा गावात एक व्यक्ती खाद्यतेलाच्या टाकीत उतरला होता. बराचवेळ झाला तरी तो वर न आल्याने इतर कर्मचारी टँकरच्या आत शिरले. त्यावेळी या सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला.

सर्व मृत कामगार पेद्दापुरम मंडलातील पडेरू आणि पुलीमेरू येथील रहिवासी आहेत. दुसरीकडे कारखाना व्यवस्थापनाने कामगारांना योग्य सुरक्षा साधने दिली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.