NSE च्या माजी प्रमुखांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर I Chitra Ramkrishna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former NSE Chief Chitra Ramkrishna

Chitra Ramkrishna : NSE च्या माजी प्रमुखांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

दिल्ली उच्च न्यायालयानं आज (गुरुवार) एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Former NSE Chief Chitra Ramkrishna) यांना फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

चित्रा रामकृष्ण यांच्यावर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (National Stock Exchange) कर्मचार्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी याबाबतचा निकाल दिलाय.

एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालकांना यापूर्वी एनएसई घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं अटक केली होती. त्यांना ईडीनं या प्रकरणात गेल्या वर्षी 14 जुलैला अटक केली होती.

सीबीआय प्रकरणात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला होता. ईडीनं सध्याच्या प्रकरणात त्यांच्या जामीन अर्जाला विरोध दर्शविला होता. रामकृष्ण यांची 2009 मध्ये एनएसईचे जॉइंट एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या 31 मार्च 2013 पर्यंत या पदावर होत्या. त्यांची 1 एप्रिल 2013 रोजी एमडी आणि सीईओ म्हणून पदोन्नती झाली. NSE मधील त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2016 मध्ये संपला.

टॅग्स :high courtdelhi