माशांनी भरलेला ट्रक उलटला; चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर

Andhra pradesh
Andhra pradeshANI
Summary

ट्रक उलटून झालेल्या या भीषण अपघातात चौघाचां जागीच मृत्यू झाला आहे.

अमरावती - आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) भीषण ट्रक अपघात झाला आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ताडेपल्लिगुडेम भागात ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रकमधून मासे वाहून नेले जात होते. पहाटेच्या सुमारास ट्रकला अपघात झाला. यात चौघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी असल्याचं पोलिस निरिक्षक रवि कुमार वीरा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com