
मेघालयात राजा रघुवंशीची हनीमूनला गेल्यानंतर हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर आता आणखी एका घटनेनं खळबळ उडाली आहे. लग्न झाल्यानंतर महिन्याभरातच तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. आंध्र प्रदेशातील कर्नूलमध्ये ही घटना घडली असून लग्नानंतर महिन्याभरात ३२ वर्षीय तेजेश्वरचा मृतदेह कालव्यात सापडला. या प्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी इश्वार्या आणि सासू सुजाता यांना ताब्यात घेतलंय. दोघींची कसून चौकशी केली जात आहे.