"मी माझ्या मुलीला..."; अनैतिक संबंधातून मुलीची हत्या करत बापाने पोस्ट केला Selfie Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

"मी माझ्या मुलीला..."; अनैतिक संबंधातून मुलीची हत्या करत बापाने पोस्ट केला Selfie Video

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. विशाखापट्टणम येथील रेली विधी या भागात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

(Father post selfie video after killed daughter)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारा प्रसाद असं आरोपीचं नाव असून तो रूग्ण वाहिकेचा ड्रायव्हर आहे. तर तो रेली विधी येथे आपल्या मुलीसोबत राहत असल्याचं समोर आलं आहे. आपल्या १९ वर्षीय मुलीचे एका मुलाशी संबंध असल्याचं लक्षात येताच त्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. तर यानंतर त्याने सेल्फी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

हेही वाचा: Voting From Home : देशाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच 'घरुन मतदान' पर्याय यशस्वी

दरम्यान, व्हायरल केलेल्या सेल्फी व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं की, "मी लहानपणापासून माझ्या मुलीला खूप चांगले संभाळले आहे. मी अनेकवेळा तिला तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाऊ नको असं सांगितलं होतं पण तिने त्या मुलाला भेटण्याचं बंद केलं नाही. त्यामुळे मी माझ्या मुलीची हत्या केली" आपल्या मुलीच्या वागण्यावरून नाराज झालेल्या पित्यानेच मुलीची हत्या केल्याने खळबळ माजली आहे.

तर या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी असलेल्या वारा प्रसाद याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली असून अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

टॅग्स :crimemurderviral video