अनेकल : बंगळूरच्या अनेकल तालुक्यातील तिरुपल्या गावात (Hebbagodi Crime News) सोमवारी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. सुमन मंडल (वय 28) या युवकाने आपल्या मित्राच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिला मंदिरा मंडल (वय 27) ही मूळची पश्चिम बंगालमधील (West Bengal) असून, गेल्या दोन वर्षांपासून तिरुपल्यात भाड्याच्या घरात राहात होती.