
श्रीनगर : पहेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला मदत केल्याने तुर्कियेबद्दल देशभरात संतापाचे वातावरण आहे. अनेक व्यावसायिकांनी त्या देशाबरोबरील व्यापार सध्या थांबविला आहे. यात भारतीय बाजारपेठेत तुर्कियेतून होणाऱ्या आयातीवर बंदी आणल्याने काश्मीरच्या सफरचंदांना मागणी वाढण्याची आशा येथील शेतकऱ्यांना वाटत आहे. आयात केलेल्या स्वस्त फळांमुळे त्यांना बाजारात विक्रीसाठी संघर्ष करावा लागतो.