Video: चिडलेल्या हत्तीने केला टेम्पोचा पाठलाग...

वृत्तसंस्था
Friday, 17 January 2020

टेम्पो आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिल्यानंतर हत्ती चिडला. हत्तीने टेम्पोचा पाठलाग सुरू केल्याचे पाहून चालकही घाबरला. अखेर हत्तीने टेम्पोच्या बोनेटचा चुराडा केला.

बंगळुरू (कर्नाटक): टेम्पो आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिल्यानंतर हत्ती चिडला. हत्तीने टेम्पोचा पाठलाग सुरू केल्याचे पाहून चालकही घाबरला. अखेर हत्तीने टेम्पोच्या बोनेटचा चुराडा केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: हत्ती चढला झाडावर अन्...

नागरहोल नॅशनल पार्क येथील रस्त्यावर ही घटना घडली आहे. एक टेम्पो रस्त्यावरून जात होता. यावेळी रस्त्यावर हत्ती उभा होता. टेम्पो आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिल्यामुळे हत्ती चिडला. हत्तीने टेम्पोचा पाठलाग सुरू करण्यास सुरवात केली. यामुळे घाबरलेल्या चालकाने टेम्पो मागे घेण्यास सुरवात केली. अखेर हत्तीने सोंडेने टेम्पोच्या बोनेटचा चुराडा केला. सुदैवाने टेम्पो चालक बचावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: angry elephant chases tempo karnataka video viral