Video: हत्ती चढला झाडावर अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियावर एका हत्तीच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला असून, मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हत्ती झाडावर चढून फणस खाताना दिसत आहे.

नवी दिल्लीः सोशल मीडियावर एका हत्तीच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला असून, मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हत्ती झाडावर चढून फणस खाताना दिसत आहे.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यांनी लिहीले आहे की, हत्ती फणस खाण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. झाडावर चढून तो फणस तोडून खातो. हत्तीला फणस खूप आवडते. हत्तीला फणसाचा वास दूरवरून येतो.'

कासवान यांनी हत्तीचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर हजारो नेटिझन्सनी तो व्हिडिओ पाहिला आहे. हत्तीच्या वजनाने झाड मोडू शकते. पण, हत्ती झाडावर जास्त वजन न टाकता अलगदपणे फणस तोडतो व खाली पडल्यानंतर खाताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elephant video went viral on social media