देश हादरला! नक्षलवाद्यांशी लढताना 22 जवान शहीद

देश हादरला! नक्षलवाद्यांशी लढताना 22 जवान शहीद

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये शनिवारी झालेल्या नक्षलवादी चकमकीत आणखी 17 जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’नं या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ज्या ठिकाणी चकमक झाली त्याच परिसरात आणखी 17 जवानांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. शनिवारी चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाले होते.

शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात बिजापूरच्या तररेम जंगलात चकमक झाली होती. तब्बल तीन तास याठिकाणी नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली.  यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर 21 जवान बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र, आता 21 पैकी 17 जवान मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित  जवानांचा शोध अजूनही सुरु आहे.  31 जवान जखमी झाले आहेत, त्यापैकी  7 जवानांची प्रकृती गंभीर आहे. चकमकीत जखमी झालेल्या 23 जवानांनर बिजापूर येथील तर 7 जवानांवर रायपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या चकमकीत काही नक्षलवादी देखील मारले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी एका नक्षलवादी महिलेचे प्रेत सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं. या नक्षलवादी विरोधी अभियानात जवळपास दोन हजार जवान सामील होते. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती. यामध्ये नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत शहीद झालल्या जवानबद्दल शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या २३ मार्च रोजी नारायणपूर जिल्ह्य़ात सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस नक्षलवाद्यांनी उडवली होती. त्या घातपाती कृत्यात जिल्हा राखीव दलाचे पाच जवान शहीद झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com