R-Infra, Reliance Power च्या संचालक पदाचा अनिल अंबानींनी दिला राजीनामा

Anil Ambani
Anil Ambaniesakal
Updated on

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. सेबीच्या आदेशानंतर त्यांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनीशी संबंध ठेवता येणार नाहीये. अनिल अंबानी यांनी सेबीच्या अंतरिम आदेशाचं पालन करून रिलायन्स पॉवरच्या बोर्डातून पायउतार झाले. रिलायन्स पॉवरने बीएसई फाइलिंगमध्ये हे स्पष्ट केलं.

Anil Ambani
संरक्षण तरतूद वाढविली; राजनाथ सिंह

रिलायन्स पॉवरने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, "सेबीच्या अंतरिम आदेशानंतर गैर-कार्यकारी संचालक अनिल अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे." फेब्रुवारीमध्ये, सेबीने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर तीन व्यक्तींना रोख बाजारातून पैसे काढण्याच्या आरोपावरून मनाई केली आहे.

Anil Ambani
कर्नाटक सरकार टिपू सुलतानचे धडे बदलणार

दरम्यान, R-Power आणि R-Infra च्या संचालक मंडळाने शुक्रवारी राहुल सरीन यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अतिरिक्त संचालक म्हणून म्हणून नियुक्ती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com