Anna Bhau Sathe: "अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या"; वर्षा गायकवाडांची लोकसभेत मागणी

Anna Bhau Sathe: "अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या"; वर्षा गायकवाडांची लोकसभेत मागणी

येत्या १ ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. या निमित्तानं वर्षा गायकवाड यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.
Published on

नवी दिल्ली : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न किताब देऊन गौरविण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली. अण्णा भाऊंचं साहित्य क्षेत्रातील योगदान आणि शोषितांसाठी त्यांनी समर्पित केलेलं आयुष्य याची दखल घेऊन त्यांना या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान व्हावा. अण्णा भाऊ यांनी आपलं उभं आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्त समाजासाठी समर्पित केलं. त्या साहित्यसम्राट, महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या"

Anna Bhau Sathe: "अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या"; वर्षा गायकवाडांची लोकसभेत मागणी
Chetan Bhagat on Rahul Gandhi: 'पप्पू इमेज बदलली', राहुल गांधींचं कौतुक करताना चेतन भगतनं भाजप 'चमच्या' IQ काढला

दरम्यान, येत्या १ ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. या निमित्तानं वर्षा गायकवाड यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com