Anna Hazare : जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेचीही नशा असते; अण्णा हजारेंनी केजरीवालांना फटकारलं

अरविंद केजरीवालांचे राजकीय गुरू समजल्या जाणाऱ्या अण्णा हजारेंनी केजरीवालांना नुकतंच एक पत्र लिहिलंय.
Anna Hazare vs Arvind Kejriwal
Anna Hazare vs Arvind Kejriwalesakal
Summary

अरविंद केजरीवालांचे राजकीय गुरू समजल्या जाणाऱ्या अण्णा हजारेंनी केजरीवालांना नुकतंच एक पत्र लिहिलंय.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे राजकीय गुरू समजल्या जाणाऱ्या अण्णा हजारेंनी (Anna Hazare) केजरीवालांना नुकतंच एक पत्र लिहिलंय. या पत्रात अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील दारूची दुकानं बंद करण्यास सांगितलंय.

अण्णा हजारे म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी 'स्वराज' या पुस्तकात खूप काही बोललं होतं. पण, त्याचा त्यांच्या आचरणावर कोणताही परिणाम दिसत नाहीय. अण्णांनी पत्रात अरविंद केजरीवालांना उद्देशून लिहिलंय, 'तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदाच पत्र लिहित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या दारू धोरणाबाबत (Liquor Policy) येत असलेल्या बातम्या वाचून खूप वाईट वाटलं.'

Anna Hazare vs Arvind Kejriwal
शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत; राहुल गांधींना देणार थेट चॅलेंज?

अण्णा पुढं म्हणाले, महात्मा गांधींच्या 'गावाकडे चला' या विचारानं प्रेरित होऊन मी माझं आयुष्य गाव, समाज आणि देशासाठी समर्पित केलं आहे. गेली 47 वर्षे मी गाव विकासासाठी काम करत असून भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करत आहे. अरविंद केजरीवाल यांना जुन्या दिवसांची आठवण करून देत अण्णा म्हणाले, तुम्ही आमच्या राळेगणसिद्धी या गावी आला आहात. इथं तुम्ही दारु, बिडी, सिगारेट इत्यादीवरील बंदीचं कौतुक केलं. राजकारणात येण्यापूर्वी तुम्ही 'स्वराज' नावाचं पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात तुम्ही ग्रामसभा, दारू धोरणाबाबत मोठमोठ्या गोष्टी लिहिल्या होत्या. तेव्हा तुमच्याकडून खूप आशा होत्या; पण राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही आदर्श विचारसरणीला विसरलात, असं त्यांनी नमूद केलं.

Anna Hazare vs Arvind Kejriwal
UP : भाजप अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भूपेंद्र चौधरींनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

तुमच्या (केजरीवाल) सरकारनं दिल्लीत नवीन मद्य धोरण तयार केलंय, जे दारू विक्री आणि सेवनास प्रोत्साहन देत आहे. या तुमच्या धोरणामुळं भ्रष्टाचारालाही प्रोत्साहन मिळेल आणि हे जनतेच्या हिताचं नाहीय. जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते, असा टोला अण्णांनी केजरीवालांना लगावलाय. अण्णांनी पत्रात आपल्या आंदोलनाचा उल्लेख करत तुमचा मार्ग चुकला असल्याचंही म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com