
Annapurna Rasoi Scheme
Sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील १७ महानगरपालिका असलेल्या शहरांमध्ये गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त व पौष्टिक भोजन देण्यासाठी ‘अन्नपूर्णा रसोई योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, राज्यात कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये आणि प्रत्येक गरीब मजुराला दिवसभर मेहनत केल्यानंतर पोटभर संतुलित भोजन मिळावे.