
नवी दिल्लीः देशात टोल भरणा अधिक सुलभ आणि स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने एक नवे पाऊल उचलले आहे. खासगी वाहनांसाठी म्हणजे कार, जीप, व्हॅनसारख्या वाहनांसाठी आता फक्त १५ रुपयांत टोल प्लाझा पार करता येणार आहे. यासाठी वाहनचालकांना एकच काम करावे लागेल, ते म्हणजे नवीन वार्षिक फास्टॅग पास घ्यावा लागेल.