esakal | Video: सिगारेट ओढणारा खेकडा झाला व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

another thing to see in 2020 is a crab smoke cigarette video viral

एखाद्या व्यक्तीप्रमाणे नांगीमध्ये सिगारेट धरून झुरके मारणारा खेडका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Video: सिगारेट ओढणारा खेकडा झाला व्हायरल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः एखाद्या व्यक्तीप्रमाणे नांगीमध्ये सिगारेट धरून झुरके मारणारा खेडका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Video: कोरोनावर मात केल्यावर आमदाराने केला मंदिरात डान्स

शाहरूख इनामदार याने खेकड्याचा व्हिडीओ शेअर केला असून, '2020 मध्ये दिसलेली आणखी एक गोष्ट म्हणजे 'A Crab Smoke Cigarette' असे शीर्षक दिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, खेकड्याने नांगीमध्ये सिगारेट धरली असून, धूर उडवताना दिसत आहे. पण, संबंधित व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे. हे समजू शकलेले नाही. दरम्यान, सिगरेटच्या पाकीटावर धुम्रपानाने कॅन्सर होण्याचा सल्ला देणारा खेकडा पाहायला मिळतो. पण, तोच खेकडा आता सिगरेटचा धूर उडवताना दिसत असल्यामुळे नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून आश्चर्य व्यक्त करत आहेत. शिवाय, खेकडा एवढ्या चांगल्या पद्धतीने सिगरेट कशी काय ओढू शकतो? असा प्रश्नही उपस्थित करत आहेत.