Video: कोरोनावर मात केल्यावर आमदाराने केला मंदिरात डान्स

वृत्तसंस्था
Monday, 21 September 2020

कोरोनावर मात केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने मंदिरात डान्स केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मधू श्रीवास्तव असे आमदाराचे नाव आहे.

अहमदाबाद (गुजरात): कोरोनावर मात केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने मंदिरात डान्स केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मधू श्रीवास्तव असे आमदाराचे नाव आहे.

खासदारांचे वेतन कपात करणारे विधेयक राज्यसभेत मंजूर

मधू श्रीवास्तव आपल्या वादग्रस्त विधान आणि कृत्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी ते डान्समुळे चर्चेत आले आहेत. वडोदरा येथील एका मंदिरात त्यांनी मास्क न लावता डान्स केला आहे. मंदिरात भजन-कीर्तन सुरू असताना ते नाचले आहेत. यावेळी त्यांचे समर्थक त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते. वाद्य वाजवणारे दोन व्यक्ती वगळता कोणीही मास्क घातलेला दिसत नाही. मंदिराच्या पुजाऱ्यानेही मास्क परिधान केलेला नव्हता. मंदिरात आपल्या समर्थकांसोबत सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

दरम्यान, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मधू श्रीवास्तव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लढाई त्यांनी जिंकली आहे. शिवाय, क्वारंटाईनचा कालावधीही पूर्ण केला आहे. पण, कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी आनंदाच्या भरात मंदिरात सुरू असलेल्या भजनावर डान्स केला आहे. मात्र, मास्क न लावता डान्स केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. श्रीवास्तव म्हणाले की, 'मी मंदिरात डान्स करत असल्याचा व्हिडीओ खरा आहे. मी प्रत्येक शनिवारी हे करतो. गेल्या 45 वर्षांपासून मी मंदिरात जात असून, यात काहीही नवीन नाही. मी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. सरकारने एकत्रित येण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तिथे मोजके लोक होते. या मंदिराचा मी मालक आहे आणि मंदिरात मास्क घालणे गरजेचे नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujarat bjp mla madhu srivastava dances inside temple without mask video viral