CAA विरोधी आंदोलन: अखिल गोगोईंची UAPA कायद्यातून निर्दोष मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Akhil Gogoi

CAA विरोधी आंदोलन: अखिल गोगोईंची UAPA कायद्यातून निर्दोष मुक्तता

गुवाहाटी : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी Unlawful Activities (Prevention) Act, 1967 कायद्याअंतर्गत अटकेत असलेले आमदार अखिल गोगोई यांना आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने दिलासा दिला आहे. NIA न्यायालयाने CAA विरोधातील आंदोलनामध्ये त्यांच्यावर ठेवलेल्या सर्व आरोपांमधून त्यांना मुक्त केलं आहे. विशेष NIA न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या अन्य तीन साथींना डिसेंबर 2019 मध्ये आसाममध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील हिंसक आंदोलनासाठी जबाबदार ठरवत UAPA कायद्याअंतर्गत अटक केली होती. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून UAPA कायदा ओळखला जातो. गोगोई हे आसाममधील शिवसागर मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत.

हेही वाचा: Zydus Cadila ची लहान मुलांसाठी लस; DCGI कडे मागितली मंजुरी

UAPA अंतर्गत त्यांच्यावरचे सर्व आरोप काढून टाकण्यात आले आहेत. आज त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते. 22 जून रोजी अपक्ष आमदार गोगोई आणि त्यांचे दोन अन्य सहकारी पहिल्या प्रकरणातून आरोपमुक्त झाले होते.

हेही वाचा: फूड डिलिव्हरीसाठी आलेल्या ढाबा मालकाच्या मुलाचा डॉक्टरवर बलात्कार

NIA चे विशेष न्यायाधीश प्रांजल दास यांनी चांदमारी प्रकरणात अखिल गोगोई आणि त्याचे तीन सहकारी धैर्य कोंवर, मानस कोंवर आणि बिटू सोनोवाल यांच्यावर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला नाही. कोर्टाने सुटकेचा आदेश कोर्टाला पाठविल्यानंतर अखिल गोगोई यांना नंतर सोडण्यात येईल. त्याचे तीन सहकारी आधीच जामिनावर सुटले आहेत.

Web Title: Anti Caa Violence Case Court Clears Assam Mla Akhil Gogoi Of All

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akhil GogoiCAA
go to top