esakal | आंदोलक शेतकऱ्यांचा भाजप आमदारावर हल्ला; अंगाला काळं फासत कपडेही फाडले
sakal

बोलून बातमी शोधा

MLA_Narang

भाजप आमदार नारंग यांच्यासह दोन नेत्यांवर आंदोलकांनी हल्ला केला.

आंदोलक शेतकऱ्यांचा भाजप आमदारावर हल्ला; अंगाला काळं फासत कपडेही फाडले

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अमृतसर : गेल्या चार महिन्यांपासून देशभरातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत, पण केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीय. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढत चालल्याचे दिसत आहे. याचाच प्रत्यय पंजाबमधील एका घटनेत दिसून आला. 

पंजाबमध्ये नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अबोहर येथील भाजपचे आमदार अरुण नारंग यांच्यावर हल्ला केला. यावेळी संतत्प शेतकऱ्यांनी भाजप आमदाराला मारहाण करत कपडेही फाडले. आंदोलकांच्या गराड्यात अडकलेल्या नग्नावस्थेतील आमदार नारंग यांना पोलिसांनी सुरक्षितस्थळी नेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे. 

मतदानापासून रोखण्यासाठी भाडोत्री गुंडांचा वापर

पंजाबमधील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ भाजप आमदार नारंग यांच्यावर आली. आमदार नारंग यांनी शनिवारी पंजाबमधील मलोट शहरातील भाजप कार्यालयात राज्य सरकारविरोधात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ही घटना घडली. संतत्प शेतकऱ्यांनी आमदाराला मारहाण केली तसेच तोंडाला काळेही फासले. नारंग भाजप कार्यालयात पोहोचताच शेतकऱ्यांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर शाईफेक केली.

यावेळी पोलिस आणि तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी वेळेचं भान राखत आमदार नारंग यांना एका दुकानात नेले. दुकानाबाहेर पडताच पुन्हा आंदोलकांनी नारंग यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत आमदार नारंग यांचे आंदोलकांनी कपडे फाडले. नारंग यांच्यासह इतर दोन भाजप नेत्यांनाही आंदोलकांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा भाजप नेत्यांना एका दुकानात नेले. काही वेळात पोलिसांनी त्या सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. दरम्यान एक पोलिस अधिकारीही यावेळी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

बांगलादेश दौऱ्यातील पंतप्रधान मोदींच्या हस्ताक्षराची चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ​

भाजप आमदार नारंग यांच्यासह दोन नेत्यांवर आंदोलकांनी हल्ला केला. लोकशाही असलेल्या देशात लोकप्रतिनिधींवरील हा हल्ला निंदनीय आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते वरुण पुरी यांनी केली आहे. 

दरम्यान, अरुण नारंग यांनी नव्या कृषी कायद्यांनाही विरोध केला होता. हे कायदे शेतकऱ्यांविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते, पण त्यांच्यावरील शेतकऱ्यांचा रोष नक्की कोणत्या कारणामुळे होता, याबाबतचं कारण स्पष्ट झालेलं नाही. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top