esakal | बांगलादेश दौऱ्यातील पंतप्रधान मोदींच्या हस्ताक्षराची चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ
sakal

बोलून बातमी शोधा

Modi sign

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी दोन दिवसीय बांगलादेशचा दौरा पार पडला. दरम्यान, मोदींची प्रत्येक दौऱ्यादरम्यान होते तशी या दौऱ्याचीही विशेष कारणानं चर्चा झाली.

बांगलादेश दौऱ्यातील पंतप्रधान मोदींच्या हस्ताक्षराची चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी दोन दिवसीय बांगलादेशचा दौरा पार पडला. दरम्यान, मोदींची प्रत्येक दौऱ्यादरम्यान होते तशी या दौऱ्याचीही विशेष कारणानं चर्चा झाली. हे कारण म्हणजे मोदींचं हस्ताक्षर. इंग्रजीत सुवाच्च आणि वळणदार शब्दांत व्हिजिटर बुकमध्ये लिहिलेल्या शुभेच्छा संदेशावर देशात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियात तर यावरुन धुमाकूळ सुरु आहे. एकीकडे मोदी समर्थक आणि दुसरीकडे विरोधक यांच्यामध्ये यावरुन चांगलीच जुंपली आहे. 

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या दौऱ्यातील पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी इथल्या व्हिजिटर बुकमध्ये या स्मारकाबद्दल इंग्रजीतून सविस्तर असा संदेश लिहिला आणि खाली हिंदीमध्ये २६.०३.२०२१ या तारखेसह आपली स्वाक्षरी केली. मोदी या वहीत संदेश लिहीत असतानाचा फोटो एएनआयनेही ट्वीट केला आहे.

प. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ८० टक्के मतदान, १९१ उमेदवारांचं नशिब EVMमध्ये कैद 

दरम्यान, एखाद्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यालाही लाजवेल अशा अत्यंत सुरेख वळणदार इंग्रजी शब्दांमध्ये लिहिलेल्या या संदेशावरुन मोदी समर्थक आणि मोदी विरोधक यांची सोशल मीडियावर चांगलीच जुंपलेली पहायला मिळाली. मोदी समर्थकांनी या हस्ताक्षरावरुन मोदींचं तोंड भरुन कौतुक केलं. हा कुठलाही फॉन्ट नसून आपल्या पंतप्रधानांची स्वाक्षरी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर मोदी विरोधकांनी या हस्ताक्षरावरच आक्षेप घेतला असून हा संदेश मोदींनी लिहिलेला नाही, असा सूर लावला आहे. सोशल मीडियावरील या धुमश्चक्रीत छत्तीसगड काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन मोदींच्या या हस्ताक्षराबरोबर त्यांनी देश विदेशात दिलेल्या भेटींदरम्यान व्हिजिटर बुकमध्ये लिहिलेल्या संदेशांच्या हस्ताक्षरांचे फोटोही ट्वीट केले. विशेष म्हणजे यातील प्रत्येक फोटोत मोदींच्या हस्ताक्षरात काहीसा फरक दिसून येत असल्याने काँग्रेसनं आता 'देशानंच यावर निर्णय करावा', असं लिहिलं आहे. 

ममतांचा पंतप्रधानांच्या दौऱ्यावर आक्षेप

दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बांगलादेशचा दौरा केल्याने आक्षेप घेतला आणि हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हटलं. तर मोदींच्या समर्थकांनी पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरु असताना मोदींनी काँग्रेसच्या लोकांना त्यांच्या हस्ताक्षऱाच्या खरंखोटं करण्याच्या कामात हुशारीने गुंतवल्याचं म्हटलं आहे. 
 

loading image