

Three MD Drug Manufacturing Units Destroyed
Sakal
पुणे : अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) महाराष्ट्रने कर्नाटकातील बंगळूर येथे धडक कारवाई करत एमडी ड्रग्ज तयार करणारे तीन कारखाने उद्ध्वस्त केले. या कारवाईत ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.