Anuj Trivedi 25 Marriages Fraud Case
esakal
ओळख लपवून तब्बल २५ महिलांशी लग्न केल्याचा आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजप आमदाराने स्वतःच्या व्याह्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये ही घटना घडली आहे. अनुज त्रिवेदी असं आरोपीचं नाव असून, भाजप आमदार ज्ञान तिवारी यांनी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.