Clean India 2.0: देशात महिनाभर चालणार 'क्लीन इंडिया २.०' मोहिम; केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

Anurag Thakur uddhav thackeray has no plans to expand sports mumbai corporation delhi
Anurag Thakur uddhav thackeray has no plans to expand sports mumbai corporation delhi Sakal

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एका ट्विटमध्ये घोषणा केली की, देशात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (भारत सरकार) युवा व्यवहार विभागाकडून 1 ऑक्टोबर, 2022 पासून एक महिनाभर देशव्यापी "स्वच्छ भारत 2.0" (Clean India 2.0) अभीयान सुरू करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून या अभियानाची सुरूवात होणार आहे.

एका व्हिडिओ संदेशात अनुराग ठाकूर म्हणाले की, त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी पंच प्राण (पाच संकल्प) बद्दल बोलले. त्यापैकी एक विकसित भारताचे उद्दिष्ट होते, ज्यामध्ये स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे स्वच्छ भारत २.० हे आमचे प्राधान्य आहे.

ठाकूर यांनी पुढे माहिती दिली की, पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) संलग्न युथ क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना संलग्न संस्थांच्या नेटवर्कद्वारे देशभरातील 744 जिल्ह्यांतील 6 लाख गावांमध्ये स्वच्छ भारत 2.0 कार्यक्रम आयोजित केला जात आहेत.

पुढे बोलताना ठाकूर यांनी माहिती दिली की, 1 ऑक्टोबर 2022 रोजी प्रयागराज येथून “स्वच्छ भारत 2.0” (Clean India 2.0) लाँच करण्यात येणार आहे, ज्याचा उद्देश जागरूकता वाढवणे, लोकांना एकत्र करणे आणि भारत स्वच्छ करण्यात त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे असा असून या उपक्रमात विविध प्रांत, भाषा आणि पार्श्वभूमीचे लोक एकत्रितपणे काम करतील आणि या लोकांकडून कचऱ्याची पूर्णपणे ऐच्छिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल.

Anurag Thakur uddhav thackeray has no plans to expand sports mumbai corporation delhi
टाटाने लॉंच केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत-रेंज

ठाकूर पुढे म्हणाले की, क्लीन इंडिया 2.0 हा केवळ एक कार्यक्रम नसून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे देशाच्या आनंद निर्देशांकात (Happiness Index)ही योगदान मिळेल. ही मोहीम देशातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम म्हणून राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी 75 लाख किलो प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट केवळ साध्य झाले नाही तर ते ओलांडले गेले. गेल्या वर्षीच्या स्वच्छ भारत मोहिमेला मिळालेल्या यशानंतर या वर्षी डिपार्टमेंट ऑफ युथ अफेअर्स एक कोटी किलो प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ठाकूर यांनी सर्वांना स्वच्छ भारत 2.0 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Anurag Thakur uddhav thackeray has no plans to expand sports mumbai corporation delhi
Flood Relief Fund : मोठी बातमी! निकषात न बसणाऱ्या पाच लाख शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर

स्वच्छ भारत कार्यक्रमाची उद्दिष्टे 01 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे आणि घरांची स्वच्छता आयोजित करणे असे आहे, ज्यामध्ये समाजातील सर्व घटकांचा तसेच सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांमधून जनजागृती करणे हा आहे. या मोहिमेसोबतच “स्वच्छ काळ: अमृत काळ” चा मंत्र देण्यात येणार असून जनभागीदारीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला लोकचळवळ बनवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com