कोरोनातही का गरजेची आहे जईई आणि नीट? शिक्षणमंत्र्यांनी सांगितले अजब कारण

Any further delay in holding NEET JEE will create untenable situation says Pokhriyal
Any further delay in holding NEET JEE will create untenable situation says Pokhriyal
Updated on

नवी दिल्ली : जेईई आणि नीट (NEET-JEE Main) परिक्षांवरून मोठा वाद चालू असतानाच केंद्रिय शिक्षणमंत्री केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी नीट (NEET) आणि जेईई (JEE) परीक्षा (NEET- JEE 2020) होणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांनी या परिक्षा का गरजेच्या आहेत याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या परिक्षांची गरज असून विद्यार्थीही परिक्षा देण्यास तयार आहेत. मात्र, काही राजकिय व्यक्तींकडून यावर राजकारण केले जात असल्याचे निशंक यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निशंख यांनी या परिक्षा गरजेचे असताना चीन आणि जर्मनीचे उदाहरण देत म्हटले आहे की, जेईई आणि नीटच्या परिक्षा देण्यास आणखी उशिर झाला तर हे शैक्षणिक वर्ष शून्य शैक्षणिक वर्ष म्हणून गणले जाईल आणि याचे परिणाम हे दिर्घकाळ राहतील असेही निशंक यांनी सांगितले आहे.

चीन आणि जर्मनीचे दिले उदाहरण
शिक्षणमंत्री निशंख यांनी चीनमध्ये होणाऱ्या नॅशनल कॉलेज प्रवेश परीक्षा Gaokao Exam आणि जर्मनीमध्ये उच्च शिक्षण संस्थानांसाठी होणारी परिक्षा परीक्षा Abitur यांची उदाहरणे दिली आहेत. चीन आणि जर्मनीने कोविड-19 महामारीच्या काळातही परिक्षांचे आयोजन केले आहे. शिक्षणमंत्र्यांनी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, देश कोरोना व्हायरसमुळे कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. परंतु, शैक्षणिक वर्षा वाया घालवून चालणार नाही, यामुळे मुलांचे करिअर खराब होऊ शकते. दरम्यान, जेईईची परिक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असून नीटची परिक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता राजकिय पक्षांनी या बाबतीत राजकारण करु नये असेही शिक्षणमंत्री निशंख यांनी म्हटले आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष परिक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाणार असून वैद्यकिय तज्ञांच्या सल्ल्यांनेच परिक्षा घेताना उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही निशंख यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com