Congress: काँग्रेस पक्षाचा खजिनदार म्हणून राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याची नियुक्ती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात पत्र काढले आहे. याआधी पवन कुमार बन्सल हे काँग्रेसचे खजिनदार म्हणून कार्यरत होते
mallikarjun kharge and rahul gandhi
mallikarjun kharge and rahul gandhisakal
Updated on

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून अजय माकन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. अजय माकन हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीं यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका पाहता हा काँग्रेसचा मोठा बदल असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात पत्र काढले आहे. याआधी पवन कुमार बन्सल हे काँग्रेसचे खजिनदार म्हणून कार्यरत होते. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक नियुक्त्या करण्यात येणार असल्याच सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक नव्या नियुक्त्या होणार असून पक्षात मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे.

mallikarjun kharge and rahul gandhi
Rahul Gandhi: राहुल गांधी शिकताहेत सुताराचं काम? पोहोचले आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये

खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर अजन माकन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाल्यानंतर माझी या पदासाठी निवड झाल्याचं मला कळालं. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मला संधी दिली आहे. त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्यासाठी त्यांचे आभार, असं ते म्हणाले आहेत.

अजय माकन कोण आहेत?

काँग्रेसचे वरिष्ठ नेता अजय माकन हे काँग्रेसचे महासचिव आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. माकन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते. तसेच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळातही ते होते. ते दोनवेळा खासदार आणि तीन वेळा दिल्ली विधानसभेत आमदार राहिलेले आहेत. माकन दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com