

Arabian Sea Monsoon Weather Forecast Maharashtra
esakal
Monsoon in Maharashtra : मॉन्सून देशात आणखी वेगाने प्रगती करत मध्य प्रदेशातील काही भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग, उत्तर प्रदेशातील काही भाग, उत्तराखंडचा बहुतांश भाग तसेच हिमाचल प्रदेश आणि लडाखमधील काही भाग व्यापला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दमण-दीवचा संपूर्ण भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीरचा संपूर्ण भाग तसेच हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबचा बहुतांश भाग आणि राजस्थानच्या काही भागांत मॉन्सून आणखी पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.