
बसस्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झालीय.
विद्यार्थिनींमध्ये जोरदार राडा, बस स्टॉपवरच एकमेकींच्या खेचल्या झिंज्या
चेन्नईतील बसस्थानकावर (Chennai Bus Stand) दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये काही कारणावरून वाद झाला. अचानक वाद इतका वाढला की, जोरदार हाणामारी सुरू झाली. पुढं अनेक मुलीही या वादात सामील झाल्या, त्यामुळं घबराटीचं वातावरण निर्माण झालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी, 26 एप्रिल रोजी चेन्नईतील बस स्टॉपवर ही घटना घडलीय.
उत्तर चेन्नईतील न्यू वॉशरमनपेट येथील बस स्टॉपवर कॉलेजच्या विद्यार्थिनी बसची वाट पाहत असताना विद्यार्थिनींमध्ये वाद झाला. गंभीर बाब म्हणजे बसस्थानकावरच त्यांच्यात जोरदार मारामारी झाली. विद्यार्थिनी जमिनीवर लोळत होत्या आणि एकमेकींशी भांडत असल्याने आसपास उभ्या असलेल्या लोकांनाही हस्तक्षेप करणं अवघड झालं होतं.
हेही वाचा: समान नागरी कायदा घटनाबाह्य, मुस्लिमांना तो मान्य नाही : मुस्लिम बोर्ड
दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी हस्तक्षेप करून गट वेगळे केले. त्यानंतर विद्यार्थिनींना सल्ला देऊन सोडण्यात आलं. त्यांच्यातील या वादाचे कारण मात्र समजू शकलेले नाही. मात्र, त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय झालाय. व्हायरल व्हिडिओत मुली एकमेकांना मारताना आणि भांडताना दिसत आहेत.
Web Title: Argument Turns Into Full Fledged Fist Fight Between 2 College Girls In Chennai Bus Stand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..