Who is Arif Khan Chishti? मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील एका मुस्लिम तरुणाने संत प्रेमानंद महाराजांना (Premanand Maharaj) आपली किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या तरुणाने महाराजांना पत्र लिहून आपली भावना मांडली असून, या घटनेमुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. या तरुणाचे नाव आरिफ खान चिश्ती असून तो इटारसी येथील रहिवासी आहे.