
पाटणा : ‘‘माध्यमांनी सगळ्या घटनांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये.’’ असे आवाहन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी गुरुवारी माध्यमांना केले. खान यांनी बिहारच्या राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते (आरजेडी) लालू प्रसाद यादव यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली.