Armed Forces Flag Day 2022 : सशस्त्र सेना दिवसाविषयी १० मोठ्या गोष्टी

दर वर्षी सशस्त्र सेना झेंडा दिवस ७ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस देशाच्या सेनेविषयी सन्मान व्यक्त करण्याचा दिवस असतो.
Armed Forces Flag Day 2022
Armed Forces Flag Day 2022 esakal

10 Big Things About Armed Fource Day : दर वर्षी सशस्त्र सेना झेंडा दिवस ७ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस देशाच्या सेनेविषयी सन्मान व्यक्त करण्याचा दिवस असतो. देशात सुख शांतता रहावी म्हणून सीमेवर लढणाऱ्या या जवानांसाठी एकजूट दाखवण्याचा हा दिवस असतो.

या दिवसाला साजरे करण्याच्या काही रोचक गोष्टी जाणून घेऊया

1. आर्म्ड फोर्स फ्लॅग डे दर वर्षी ७ डिसेंबरला साजरा केला जातो. यंदा बुधवार आहे.

2. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रक्षा समितीने सेना आणि त्यांच्या परिजनांच्या कल्याणासाठी ७ डिसेंबर तारीख निश्चित केली असून याची सुरूवात १९४९ मध्ये झाली आहे.

Armed Forces Flag Day 2022
Indian Armed Forces Flag Day 2020: का साजरा करतात भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस?

3. या दिवसाला साजरे करण्याचे मुख्य तीन उद्दीष्ट्ये

  • युध्द काळात झालेल्या नुकसानात मदत म्हणून

  • सेनेत काम करणारे जवान आणि त्यांच्या परिवाराला मदत म्हणून

  • सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या परिवाराला मदत म्हणून

Armed Forces Flag Day 2022
Air Force : वायुसेनेच्या सागरी हवाई ऑपरेशन कमांडच्या प्रमुख पदी एअर व्हाईस मार्शल रजत मोहन

4. हा दिवस आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी दिवस रात्र झटणाऱ्या जवान आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो.

5. देशभरात एकत्रित धनाच्या बदल्यात लाल, नीळे आणि आकाशी रंगाचे झेंडे दिले जातात. हे तीन्ही रंग भारतीय लष्कर, नौसेना आणि वायू दलाचे प्रतिक असते.

6. आपल्या या त्रीदलातील जवानांचे धैर्य वाढवण्याचा हा दिवस असतो.

Armed Forces Flag Day 2022
Air Force Day : हवाई दलाला आता नवा ‘लढाऊ’ गणवेश

7. दिवसरात्र सीमेवर सतर्क असणाऱ्या या सेनेतले जवान कधी दिव्यांग होतात, कोणाला गंभीर आजार होतात, अशा जवानांसाठी या दिवशी पैसे जमा केले जातात.

8. दरवर्षी साधारण ६० हजार सैनिक रिटायर होतात. या दिवशी जमा झालेल्या पैशातून या निवृत्त सैनिकांना मदत केली जाते.

9. या दिवशी त्रीदलाद्वारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी जमा झालेला निधी आर्म्ड फेर्सेज डे फंडात जमा केला जातो.

10. स्वातंत्र्यानंतर सीमेवर असणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या गरजांसाठी काही सोय करणे आवश्यक असल्याचं गरज भासल्यामुळे १९४९ मध्ये हा झेंडा दिवस सुरू करण्यात आला. तो आजतागायत सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com