Indian Armed Forces Flag Day 2023: भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस का साजरा करतात ?

हा दिवस देशाच्या सैनिकांसाठी आहे जे कोणत्याही परिस्थितीत आपल्या नागरिकांची सुरक्षा करतात.
armed force
armed forceesakal

Indian Armed Forces Flag Day 2023 : भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस हा 7 डिसेंबरला साजरा केला जातो. हा दिवस शहीद आणि देशाच्या संरक्षणासाठी आपले बलिदान दिलेल्या जवानांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. देशाचे लोक या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली देत असतात. भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस भूदल, नौदल, वायुदल सैनिकांच्या सन्मानासाठी साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस का साजरा केला जातो, त्यामागील इतिहास काय आहे हे ?

28 ऑगस्ट 1949 मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. कमिटीने निर्णय घेतला की 7 डिसेंबरला झेंडा दिवस साजरा केला जावा. झेंडा दिवस साजरा करण्याचा उद्देश सुरुवातीला नागरिकांमध्ये छोटे छोटे झेंडे वाटले जावेत आणि याद्वारे सैनिकांसाठी निधी गोळा करण्याचा हेतू होता. 

सीरमच्या CEO नीं मानले PM मोदींचे आभार; देशात पहिली लस देण्याचा व्यक्त केला...

भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवसाचे महत्व

देशाच्या नागरिकांचे कर्तव्य आहे की त्यांनी शहीदांच्या आणि आपल्या देशाच्या नायकांच्या (जे आपले कर्तव्य बजावत असताना गंभीर जखमी झाले) बलिदानाचा गौरव करावा आणि त्यांच्या परिवारांच्या मदतीसाठी एक आधार बनावा. भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस मुख्य करुन सैनिक आणि त्यांच्या परिवाराच्या कल्याणासाठी, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारांच्या कल्याणासाठी आहे.

या दिवशी कर्तव्य बजावताना शहीद आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या परिवाराच्या उत्थानासाठी आहे. या दिवसाचे खूप महत्व आहे कारण युद्धात जखमी सैनिक आणि शहीदांच्या परिवाराची देखभाल यासाठी आपली प्रतिबद्धता व्यक्त केली जाते. 

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या दिंडीला आज ३९ वर्ष पूर्ण !

भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवसाची थीम

भारतीय सशस्त्र सैना झेंडा दिवसाची कोणतीही स्पेशल थीम नाही. हा दिवस देशाच्या सैनिकांसाठी आहे जे कोणत्याही परिस्थितीत आपल्या नागरिकांची सुरक्षा करतात. देशाचा प्रत्येक नागरिक अशा वीरांचा ऋणी आहे, ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी आपला प्राण त्यागला आहे. भारत सरकारद्वारे सशस्त्र सेना झेंडा दिवस फंडमध्ये दान देण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे नागरिक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com