कोरोनाच्या लढ्यात आता सैन्य दलं मैदानात; निवृत्त मेडिकल स्टाफला पुन्हा बोलावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CDS general bipin rawat

कोरोनाच्या लढ्यात आता सैन्य दलं मैदानात; निवृत्त मेडिकल स्टाफला पुन्हा बोलावणार

नवी दिल्ली : शत्रूंशी लढणाऱ्या सैनिकांना वैद्यकीय मदतीद्वारे नवसंजीवनी देणारे हात आता देशातील कोरोनाविरोधातील लढ्यात प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत. देशातील कोरोनाच्या उद्रेकाची स्थिती हाताळण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी आपल्या निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेसाठी बोलावलं आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेससह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा हातभार लागेल. सैन्याच्या तिन्ही दलांमधून गेल्या दोन वर्षात जे वैद्यकीय कर्मचारी निवृत्त झाले आहेत किंवा ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे, अशा लोकांना सैन्य दलांनी पुन्हा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना ते ज्या ठिकाणी सध्या राहत आहेत त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, या निवृत्त कर्माचाऱ्यांना पुन्हा बोलावण्याचा निर्णय आम्ही घेतला असून देशातील कोविडची स्थिती हाताळण्यासाठी तयारी आणि कार्यक्रम सुरु केला आहे. गेल्या दोन वर्षात जे वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाले आहेत त्यांना पुन्हा वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये काम करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सैन्य दलांकडे जे ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध आहेत ते देखील विविध रुग्णालयांना पाठवण्यात आले आहेत.

यावेळी मोदींनी सांगितलं की, कमांड हेडक्वार्टर्स, पोलीस हेडक्वार्टर्स, डिव्हिजन हेडक्वार्टर्स तसेच नौदल आणि हवाई दलाकडून सर्व वैद्यकिय अधिकारी विविध रुग्णालयांमध्ये रुजू करण्यात येतील. त्याचबरोबर मोदींनी सूचना केली की, केंद्रीय आणि राज्य सैनिक कल्याण मंडळ आणि अधिकारी जे विविध हेडक्वार्टर्समध्ये सेवेत आहेत त्यांनीही या कार्यात मदत करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

दरम्यान, सीडीएस रावत म्हणाले, विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी नर्सिंग कर्मचाऱ्यांना देखील रुजू करण्यात येईल. सैन्याच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांच्यामधून सर्वसामान्य नागरिकांना गरज पडेल तेव्हा मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.

Web Title: Armed Forces Recall Retired Medical Staff To Work Against Covid 19 Pandemic In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus
go to top