उरीमध्ये इंडियन आर्मीने पकडला जिवंत पाकिस्तानी दहशतवादी|uri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian army

उरीमध्ये इंडियन आर्मीने पकडला जिवंत पाकिस्तानी दहशतवादी

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या (jammu-kashmir) उरी सेक्टरमध्ये (uri sector) एका पाकिस्तानी घुसखोराला (Pakistan infiltrator) जिवंत पकडण्यात भारतीय लष्कराला (indian army) यश आलं आहे. दुसऱ्या घुसखोराचा सैन्याने खात्मा केला आहे. उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात आल्याचं लष्करातील सूत्रांनी सांगितले. १८-१९ सप्टेंबरपासून उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. ताब्यात असलेला दहशतवादी याच मोहिमेवर होता, असे सूत्रांनी सांगितले.

नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये झालेल्या गोळीबारात चार जवान गोळी लागून जखमी झाले आहेत. मागच्या दोन दिवसात उरीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी शिरलेल्या या दहशतवाद्यांचा लष्कराने माग काढला आहे. आतापर्यंत एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला असून लष्कर अन्य दहशतवाद्यांचा शोध घेत आहे.

हेही वाचा: मी काहीही चुकीचं केलेलं नाही, ED चौकशीपूर्वी अनिल परब यांचं विधान

शनिवारी भारतीय लष्कराला काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर त्यांनी उरी सेक्टरमध्ये शोध मोहिम सुरु केली होती. घुसखोरांनी केलेल्या गोळीबारात चार सैनिक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. मागच्या आठवड्यात काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता. तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता व मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत केला होता.

loading image
go to top