
मी काहीही चुकीचं केलेलं नाही, ED चौकशीपूर्वी अनिल परब यांचं विधान
मुंबई: "मला ईडीचं (ED) दुसर समन्स (Summons) मिळालं आहे. मी आता चौकशीला जात आहे. मी शिवसेनाप्रमुखांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगेन की, मी काहीही चुकीचं काम केलेलं नाही" असं अनिल परब (Anil parab) चौकशीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले. ते राज्याचे परिवहन मंत्री (Transport minister) आहेत. ईडीने चौकशीसाठी अनिल परब यांना समन्स बजावलं आहे.
"ईडीने नेमकी कशासाठी नोटीस बजावलीय, ते आपल्याला माहित नाही" असे अनिल परब यांनी सांगितले. "मी चौकशीला पूर्ण सहकार्य करीन. मला का बोलावलय ते अजूनही माहित नाही. मी चौकशीला तिथे गेल्यानंतरच समजेल. आज चौकशीला बोलावलं आहे. माझ्याकडून कुठलीही चूक झालेली नाही" असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: येत्या चार महिन्यात अर्धे मंत्रिमंडळ गायब,अर्धे हॉस्पिटलात; किरीट सोमय्या
अनिल परब ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांची चौकशी होणार आहे. पालिका कंत्राटदाराकडून वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप सचिन वाजेने केला होता, तसेच परिवहन विभागातील भ्रष्टाचाराबाबत गजेंद्र पाटील यांनीही ईडीत तक्रार दाखल केली होती. पहिल्या समन्सला परब हे गैरहजर राहिले होते.
हेही वाचा: यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात ST गेली वाहून, तीन जणांचा मृत्यू
मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमध्ये अनिल परब महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसले होते. तेव्हापासूनच, अनिल परब यांना टार्गेट करण्यात येईल, अशी चर्चा होती. अखेर मागच्या महिन्यात अनिल परब यांना ED कडून पहिली नोटीस बजावण्यात आली होती.
Web Title: I Not Did Anything Wrong Anil Parab
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..