पाकिस्तान-चीन एकत्र आले तर...; लष्कर प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 12 January 2021

एमएम नरवणे यांनी पाकिस्तान आणि चीनवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली- पाकिस्तान आणि चीन सीमेवर तणावाची स्थिती असताना हे दोन्ही देश मिळून भारतासाठी धोकादायक ठरु शकतात,असं लष्कर प्रमुख एमएम नरवणे पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान आणि चीन एकत्र आल्यास भारतासाठी धोका ठरु शकतात. तसेच हे दोघे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारकडून सैन्याला सध्या पूर्व लडाखमध्ये सतर्क राहण्याचे निर्देश मिळाले आहेत. जेथे चीनसोबत भारताचा तणाव कायम आहे. 

कृषी कायद्यांवर स्थगिती आणून तोडग्यासाठी समिती बनवू; सुप्रीम कोर्टात सुनावणीला...

एमएम नरवणे यांनी पाकिस्तान आणि चीनवर जोरदार हल्लाबोलही केला. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत आहे, ते दहशतवादाचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आले आहेत. भारतीय सैन्याने आतंकवादावर झीरो टॉलरन्लसची निती वापरली आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन केला जाणार नाही आणि जोरदार पत्युत्तर दिलं जाईल. एक रोडमॅप तयार करण्यात आला असून भविष्यातील सर्व आव्हानांचा सामना केला जाईल, असं ते म्हणाले आहेत. 

नरवणे यांनी चिंता व्यक्त करतानाच भारत कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. लडाखच नाही तर संपूर्ण उत्तर सीमेवर भारतीय सैन्य सतर्क आहे. सरकारने सैन्याला पूर्व लडाखमध्ये तैनात राहण्याचे निर्देश दिले आहेत. विविध स्तरांवर सुरु असणाऱ्या चर्चेत तोडगा निघण्याची शक्यता आहे. चीनसोबत भारताची नवव्या चर्चेची फेरी पार पडणार आहे. 

नरवणे म्हणाले की, उत्तर सीमेवर भारतीय सैन्य सतर्क आहे. एलएसीच्या मध्य आणि पूर्व क्षेत्रांमध्ये चीनने पायाभूत बांधकाम केलं आहे. आम्ही यावर लक्ष ठेवून असून याचा सामना करण्यासाठी रणनिती बनवली जात आहे. उत्तर सीमेसंबंधी आपली रणनिती बदलण्याची आवश्यकता होती आणि राष्ट्रीय लक्ष्य आणि उद्देश प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रत्येक स्तरावर तयार आहोत. जुलै महिन्यापासून महिला पायलटांची भरती होणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army Chief General Manoj Mukund Naravane said about pakistan china